तांदळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचे ६ फेब्रुवारीला उद्घाटन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६
तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा प्रतिनिधी):
तांदळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, तांदळी दुमाला यांची नवीन प्रशासकीय इमारत येत्या शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता भव्य उद्घाटन समारंभात लोकार्पण होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी सोसायटीचे (चेअरमन) संजय उर्फ रायचंद शेळके, (व्हा. चेअरमन) नानासाहेब हराळ तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नवीन इमारतीमुळे सभासदांना आधुनिक सुविधा, पारदर्शक सेवा आणि सहकाराच्या कार्यात अधिक गतिमानता मिळणार आहे.
तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व सभासद बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन, व्हा चेअरमन सर्व संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे. नवीन इमारत ही तांदळी दुमाला गावाच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.
🔴🟢🟠🟣
