कृषी औषध विक्री गुपचुप स्वतंत्ररीत्या गोडाऊनमधून चालूच : श्रीगोंदा,अहिल्यानगर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १४ फेब्रुवारी २०२६
💥कृषी अधिकारी यांनी शोध मोहीम हाती घेण्याची गरज 💥
जिल्हा प्रतिनिधी:बोगस कंपनीच्या लेटरहेडशिवाय (कंपनी पत्र) औषध/खते विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. परंतु कृषी अधिकारी यांना अंधारात ठेवून स्वतंत्ररीत्या गोडाऊन ठेऊन विक्री हि श्रीगोंद्यासह संपूर्ण जिल्ह्यात बनावटी आणि बिना सेफ्टी औषध विक्री चालूच आहे. अनेक कृषी दुकान विक्रेते अशा औषधापासून दाम दुप्पट पैसे मिळविण्याकरता दुकान व्यतिरिक्त गोडाऊन करुन लुपेछुपे विक्री करत असल्याबाबत समजत आहे. दारू विक्री पेक्षा जास्त पैसा बनावटी औषधांमध्ये मिळत असल्याने हॉटेल टाकण्याऐवजी अशी कृषी परवाने घेऊन बनावटी दारू प्रमाणे पैसे मिळविणारे गोडाऊन करण्यात आले आहे.
अधिकारी व्यक्तींना दुकानातील औषधे तपासणी करवत असून बनावटी बॉटल विक्री गोडाऊन मधून करण्यात येत आहे. कृषी अधिकारी यांनी दुकानदार यांच्या गोडाऊन सह घरवरती हि छापे टाकावेत
दारू विक्री प्रमाणे डूब्लिकेट आणि घातक औषधे शेतकऱ्यांना दिली जात असल्याने उत्पन्न वाढविणारी फॉर्म्युला वापरून जहर विकणारे दुकानदार आहे. वरिजनाल औषध विकसित कंपनीचे फॉर्म्युला वापरून स्टिकर तयार करण्यात आले आहेत.
मुळातच कृषी औषध हे कॉपी करत दारू व्यवसायाप्रमाणे मानवी जीवनास घातक ठरत आहे. पिकांवरील फवारणी आता रोगाला निमंत्रण देत आहेत.या करता शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग व पोलीस संयुक्तरीत्या छापे टाकून, मालाची जप्ती व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाची गुणनियंत्रण यंत्रणा कार्यरत करावी.
बोगस/विनापरवाना औषध विक्रीवर्ती कारवाई हि लवकरात लवकर सुरू करावी. अशा नामांकित कंपनीच्या नावावर बनावट औषध विकणाऱ्यांवर पोलीस व कृषी विभागातर्फे गुन्हे दाखल करून बनावटी औषधे जप्त करावीत.अशा औषध फवारणीने आरोग्यच्या तक्रारी उद्भवतील व मानवी जीवन धोक्यात येऊ नये. अशा औषध विक्रेत्याला पकडावे
दोषींवर निलंबन: बनावट खते/औषधे विक्री आढळल्यास दुकाने सील करण्यात यावीत.
तक्रार करण्याचे ठिकाण:कोणतीही अनियमितता किंवा संशयास्पद औषध आढळल्यास, तत्काळ स्थानिक कृषी अधिकारी किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.परवाना नसताना किंवा बनावट औषधे विकल्यास ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत कडक शिक्षा आणि दंड करण्यात यावा
महत्त्वाचे:शेतकऱ्यांनी जागरूक राहून नामांकित कंपन्यांचीच उत्पादने खरेदी करावीत आणि बनावट उत्पादनांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते.
टीप:औषध तपासणी पथकाने औषध विक्रेत्याच्या घरापर्यंत चेकिंग हि सक्तीने करावी.
🔴🟢🟠🟣
