महाशिवरात्र म्हणजे काय
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १५ फेब्रुवारी २०२६
महाशिवरात्र म्हणजे काय सर्वात पवित्र अशी संध्या रात्र आहे. या दिवशी महाशिव नाम घेणे आध्यात्मिक दृष्टीने चांगले समजले जाते. या दिवस रात्री मन एकाग्र करणे आवश्यक आहे.
मन चित्त बुद्धी आणि देह धारणा करणे पवित्र मानले गेले आहे.या दिवशी सर्व पृथ्वीवरती भगवान शंकर यांचा वास होत असतो. या मागचे गुपित रहस्य असे की ग्रह सुधा स्थिर असतात. याने सर्व ब्रम्हांडात स्थिरता असते. अशा स्थिरतेने दैवी शक्तीच्या लहरी संपूर्ण ब्रम्हांडात फिरतात. या वेळी भजन कीर्तन आणि नामजप पृथ्वी वरती आकर्षित करण्यात येत असते. आज संपूर्ण भारत देशासहित काही हिंदू देशात महाशिवरात्र उत्सव साजरा केला जातो. तसेच काल्पनिक कथा काही सत्य कथा शंकर भगवान विषयी सांगणारे अभ्यासू ज्ञानी महाजन श्रोता श्रवण करून ऐकवत असतात.
मार्गदर्शन हे पुस्तकातील लिखित ओवी पाहून बोध दिला जातो.पण काय सत्य आणि काय चुकीचे आज पर्यंत समजलेले नाही म्हणून आपण केलेल्या भक्तीने आणि नामस्मरणाने आपली भक्ती हि शंकर भगवान दैवते पर्यंत पोहोचे होते. परंतु असे काही नाही की तुम्ही मंदिरात जाऊन खूप वेळ बसावे. आपल्या घरातील मंदिर घरात हि आपण वेळ देऊन नाम जप शांत चित्ताने करावे. अगदी सहजतेने आपली भक्ती महादेव यांच्याकडे पोहच होईल.
पृथ्वीवर असणारे 12 ज्योतिर्लिंग केंद्र बिंदू आहेतच परंतु आपले आपल्या घरी देखील अशेच केंद्र बिंदू बनले तर जास्त फायद्याचे ठरेल.उदा: प्रत्येक ज्योतिर्लिंग भक्तीने स्थापन झाले आहे आणि स्वयंभू आहे. मोठ्या आवाजात स्पीकर लाऊन भक्ती केल्याने देव मिळतो असा नाही. आपण हा परमेश्वर प्राणी, जल भूमी, दगड ,माती, तसेच पक्षी पाळीव प्राण्यात पाहण्याची जास्त गरज आहे .
आपण भक्ती करण्यासाठी सकाळ संध्याकाळ तयारीत असता पण याचे मुख्य कारण म्हणजे सकाळी शांत आणि शुद्ध हवा ऊर्जा प्रदान करते, तसेच सर्व पृथ्वीवरील कलकल आवाज बंद असतो. म्हणून तर आपण सकाळी पूजा करतोय असेच रहस्य आहे की ग्रह सुधा सकाळी दूषित हवेने आणि, आवाजाने हालचाल स्थिरते म्हणून आपण आपल्या दररोजच्या जीवनात अशा स्थिर वेळेत जप करावा.
आज सूर्य किरणे सौम्य आहेत तसेच घर्षण आणि पृथ्वी गृतआकर्षण कमी राहिल याने गती मिळते अशी अनेक नैसर्गिक, वैदिक, वैज्ञानिक कारणे मिळवावेत. सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा विश्व निर्माता मुख्य संपादक वैभव हराळ यांच्या कडून
टीप: कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेऊन पैसे खर्च करू नये. भारत माता की जय
🔴🟢🟠🟣
