रावणाची लंका पेटली कशी सत्य कथा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६
जेव्हा हनुमान लंका पेटून राम भगवंताकडे आले तेव्हा एकच विचार पडला होता एव्हडी मोठी लंका आणि बलाढ्य लंकेचे सैनिक सीमेवर कडक निगराणी ठेऊन सुधा हनुमान लंका पेटून आले कसे जे काम अशक्य होते.
हा विचार राम भगवंताच्या मनात आला नसून लखन ने केला होता. या वेळेस लखन यांनी हनुमान यांना विचारणा केली बाबा तू एव्हढी मोठी लंका कशी पेटवली आहेस तर हनुमान बोलू लागले. मी पेटविण्या अगोदरच लंकेतील जनता पेटून उठली होती.
लंकेश्वर यांनी लंकेतील जनतेवर अन्याय सतत चालू असल्याने हनुमान ➡️मी फक्त दोन तीन जागेवरच पेटविले परंतु जनतेनेच सगळीकडे आग पुरविण्यास सुरवात केली होती. रावणाचा महाल पेटताना पाहताच आसपास असणारे नागरिक अजून आगीत तेल घालत विस्तु पांगवू लागले. रावांचा महिलांवरील अत्याचार लंकेत कायम स्वरुपी होता. कोणाचीही हिम्मत होत नव्हती त्या मुळे क्रूर रावणासमोर कोणी जात नसे आज आगींनी पेट धरला होता. हा शेवटचा पर्याय उरला होता. लंकेतील सर्व या आणि इतर राज्याच्या राण्या कैदेत ठेवलेल्या होत्या त्यांची सुटका हनुमंतानी केली. आणि या सर्वांनी वेगवेगळ्या दिशेने लंकेला पेटवून उध्वस्त केले.
तात्पर्य: जनतेला त्रास दिला नसता तर संपूर्ण लंका पेटली नसती.
गूढ: लंकेचे नागरिक अत्याचारी रावणाला संपविण्याचा हात
रावण स्वभाव गुण,: परस्त्री हट्टी ,अत्याचारी, व्यभिचारी, अन्यायी,लोभी,
🔴🟢🟠🟣
