राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी अण्णासाहेब बनसोडे यांची निवड
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६
जिल्हा प्रतिनिधी: मनीष खुराणा
अहिल्यानगर:आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कर्तव्यनिष्ठ पत्रकार श्री. अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्याप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांची कार्यतत्परता विचारात घेऊन संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी एकमताने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
श्री. बनसोडे यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेतून नेहमीच जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कौतुक व शुभेच्छा ➡️
या निवडीनंतर बोलताना संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अण्णासाहेब बनसोडे हे एक अभ्यासू, निष्ठावान आणि समाजनिष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल आणि संघटनेची ताकद निश्चितच वाढेल. सामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या श्री. अण्णासाहेब बनसोडे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रमुख मार्गदर्शनाखाली ➡️
यावेळी श्री. अण्णासाहेब बनसोडे यांची ही निवड संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तुषारजी महाजन, संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदुवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल व राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उपाध्यक्षपदी निवडी नंतर राज्यभरातून अभिनंदन ➡️
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अढांगळे, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजुमले व प्रितमसिंग चौहान, अत्याचार निवारण समितीचे राज्याध्यक्ष दत्ता पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज बाबा वाघ आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडीचे स्वागत करत श्री. बनसोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राज्यभरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
विशेष:अण्णासाहेब बनसोडे हे एक अभ्यासू ,अनुभवी निष्ठावान आणि समाजनिष्ठ पत्रकार आहेत.
त्यांनी केलेले कार्य;बनसोडे यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेतून नेहमीच जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
🔴🟢🟠🟣
