बहुचर्चित अपहरण खंडणी प्रकरणात मोठा ट्विस्ट युवा नेते अजय भाऊ शेळके यांच्या वरील फिर्याद हायकोर्टाच्या आदेशाने रद्द, …
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २१ फेब्रुवारी २०२६
तालुका प्रतिनिधी: माधव बनसुडे
श्रीगोंदा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही व्यापारी यांच्या माध्यमातून १३ सप्टेंबर रोजी अपहरण खंडणीचा गुन्हा युवा नेते अजय भाऊ शेळके व मार्केट कमिटीचे संचालक बाबा जगताप व इतर काही लोक यांच्यावर दाखल झाला होता परंतु २० सप्टेंबर रोजी श्रीगोंदा न्यायालय येथे लगेच जामीन मंजूर झाला .
अजय भाऊ शेळके यांनी छत्रपती संभाजी नगर येथे धाव घेऊन उच्च न्यायालय येथे फिर्याद रद्द साठी मागणी केली होती ती मागणी न्यायालयाने मंजूर केले असून अजय भाऊ शेळके व इतर सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलेले होते त्यामध्ये प्रामुख्याने युवा नेते अजय भाऊ शेळके यांना टार्गेट करण्यात आले होते. अनेक राजकीय नेत्यांसोबत व अधिकाऱ्यांसोबत त्यांची उठबस असते अनेक वर्षांपासून त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो त्यामुळे त्यांच्यावरती अनेक रील बनवल्या होत्या.
त्यांनी संघर्ष करत व न्याय देवतेवर विश्वास ठेवत त्याला सामोरे गेले व आश्चर्यकारक पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये हायकोर्टाच्या आदेशाने फिर्याद रद्द करून दाखवली . भानगाव पंचायत समिती गणामध्ये त्यांचे नाव अनेक वेळा चर्चेत आलेले आहेत. आगामी काळात निवडणुका असल्याने या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. भानगाव पंचायत समिती गणामध्ये अजय भाऊ शेळके यांच्या माध्यमातून एक नवा अभ्यासू चेहरा दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
➡️ राजकीय वर्तुळ:भाऊ पंचायत समिती निवडणुकीत उभे राहतील काय
🔴🟢🟠🟣
