अहिल्यानगर दुष्काळी भागात जनावरांसाठी छावण्या लवकर सुरू करण्याची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २१ फेब्रुवारी २०२६
अहिल्यानगर:उन्हाळी दिवसात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि पाळीव जनावरांना चारा कायम गरजेचा आहे. म्हणून पाणी हे ज्या ठिकाणी पाटबंधारे,चारी, तलाव नाहीत अशा दुर्गम भागात चारा कमी पडत आहे.पाळीव जनावरे चारा नसल्याने विक्री आणि स्थलांतर होत आहे.पाळीव आणि दुग्ध व्यवसाय कमी पडल्याने त्या ठिकाणावरील पाळीव जनावरांना किंमती कमी दरात विक्री पर्यायाने कमी दरात कारवी लागत आहे.
अशा परिस्थितीत गाई,म्हैस,बकरी, बोकड,शेळी, आणि जलसी,गावरान गाई यांना एक टाइम उपवास धरावा लागणार आहे.तरी चारा डेपो हा (महाराष्ट्र शासन)राज्य सरकारकडून (मदत व पुनर्वसन विभाग) यांनी लवकरच चालू करावा.कर्जत, पारनेर,जामखेड,नगर,तालुक्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी, आणि दुग्ध व्यावसायिक चिंतेत दिसून आले.शेतीतील पिकांना ओलावा पाहिजे.
तर गुरांना चाऱ्याबरोबर पाणी अशा परिस्थितीत धान्य पिकाला पाणी वापर करावा की चाऱ्यासाठी सर्व काही विचार गोंधळल्याने सत्ताधारी पक्ष आमदार यांनी चारा डेपो आणि छावण्या लवकरच सुरू करण्याचे आदेश काढावेत. दुग्ध व्यवसाय यांना दिलासा मिळून दिला पाहिजे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांनी केली विनंती.
आरोग्यची हानी;गुरांना चारा वेळेला नसल्याने गुरांची शारीरिक कुचंबना दुखापत होत असल्याबाबत सांगण्यात आले.
टीप; आदेश :लवकरात लवकर छावण्या सुरू कराव्यात मुख्यमंत्री, आमदार खासदार,
🔴🟢🟠🟣
