प्रसिद्ध पीव्हीसी पाईप कंपनीच्या नावाने बनावट पाइप विक्री तर ग्राहकांची फसवणूक आणि प्रसिद्ध कंपनीची बदनामी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २२ फेब्रुवारी २०२६
अहिल्यानगर प्रतिनिधी : प्रसिद्ध सिंचन उपकरण निर्माता कंपनी ‘जैन पाइप’ या ब्रँडच्या नावाचा व लोगोचा गैरवापर करून बनावट पाइप तयार करून विक्री हि कितेक वर्षांपासून श्रीगोंदा, अहिल्यानगर मध्ये सुरू आहे.पाईप विषयी शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.पाईप हा जैन किंवा इतर प्रसिद्ध कंपनीच्या नावाने शिक्का मारून विकला जात आहे. ब्रँड च्या नावाखाली पैसे उकळनारे व्यावसायिक सुप्रसिद्ध कंपनीच्या नावाखाली विक्री करत आहेत.
पाईप विषयी सतत तक्रारी मिळत होत्या की, ‘जैन पाइप्स एंड स्प्रिंकलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने बाजारात विकले जाणारे पाइप हे मूळ जैन पाइपसारखेच दिसत असून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. बनावट कंपनीचे पाईप खरेदी नंतर पाईपलाइन करून वापरल्यानंतर डॉन तीन वर्षाने लिकेज होतात.
या दरम्यान लाखो रुपयांची लूट होऊन पुन्हा ग्राहकांना दिशाभूल करणारे उत्तरे देऊन पटाईत करणारे व्यापारी कोटीची उलाढाल करत आहेत. प्रत्येकी पाईप खरेदी तीन इंच अंदाजे ६७०; किंवा जास्त असून कॉपी राईत करून सुमारे ३५० ते ४०० रुपये पाइपा मागे मिळवत आहेत. सर्व हार्डवेअर किमतीची बिले कच्ची असून जी एस टी स्वरूपात मिळत नाहीत.
शेतकरी पाईप पुरून पाणी वापर हा करतो. आणि पाईप दोन ते तीन वर्षात हवेच्या एअर ने दाबून चिपोटी होणे आणि पाण्याचा दाब बसून फुटत आहेत. हार्डवेयर मध्ये विक्री होत असलेल्या बनावटी शिक्का मारलेल्या वस्तुंचा पैसा मिळविला जात आहे. अशा सर्व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यारती आणि दुकानदारांवर्ती कारवाई करण्यात यावी.
हे उत्पादन कंपनीच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क व कॉपीराइट शैलीचे उल्लंघन करणारे आहे.या प्रकरणी कंपनीने श्रीगोंदे सह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व हार्डवेअर व्यावसायिकांची गोडाऊन चेक करावे बनावटी कंपनीवरती त्या ठिकाणी छापा टाकावेत मोठ्या प्रमाणात बनावट पाइप साठा करण्यात आला आहे.‘या नावाने पाइप खरेदी, साठवणूक, विक्री, मार्केटिंग किंवा जाहिरात करणे बेकायदेशीर आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.नामांकित ब्रँडच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळावी.अशा बनावट उत्पादनांच्या विरोधात मोठी कारवाई लवकरात लवकर करावी.बाजारातील ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.
महत्वाचे:शेतकरी व ग्राहकांनी अधिकृत डीलर्सकडूनच उत्पादने खरेदी करावीत,२)isi रिमार्क सह पक्के बिल पाहून खरेदी करावी. ३)पीव्हीसी पाईप दर पडताळून पहावा. ४)पीव्हीसी पाईप वजन मोजून पहावे. ५) पाईपातील आतील जाडी इंची मध्ये मोजून पाहावी. पीव्हीसी पाईप दाबून चिकाटी आणि ग्रीव्हिटी चेक करावी ६) बीलावरील डीलर्स कोड चेक करावा.७) बिल जीएसटी कोड व्यवस्थित पहावा.८) दुकानदार पॅन कार्ड आणि जीएसटी बिल पाहून घ्यावे तसेच बिलावरील जी एस टी एकच आहे खत्री करावा.
टीप: आयकर विभागाने त्वरित बोगस बिल व्यावसायिकांवरती कारवाई करण्याचे आदेश जारी करावेत.गोडाऊन,गोदाम, वस्तू साठा जप्त करावेत. स्थळ: अहिल्यानगर सह तालुके पाहणी करण्याची मागणी.
🔴🟢🟠🟣
