साई सेवा पतसंथेच्या विरोधात तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्च्या
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार १० मार्च २०२६
महाराष्ट्र प्रतिनिधी (शिवाजी खोमणे) आज दि १० मार्च २०२६ रोजी साई संस्थान वरती मोठ्या संख्खेने विराट जन आक्रोश मोर्च्या चे आयोजन करण्यात आले होते,या वेळी मोर्च्या सर्व प्रथम तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांच्या दालनात जाऊन निवेदन दिले,यावेळी तहसीलदार साहेब यांनी निवेदन स्वीकारून लोकांना आश्वासित केले,
यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला,त्यानंतर मोर्च्या पोलिस स्टेशन येथे घोषणा देत गेला,परंतु पोलिस निरीक्षक किरण शिंदे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने पोलिस उप निरीक्षक अहिरे साहेब हे उपस्थित राहून त्यानी मोर्च्याला संबोधित केले आणि निवेदन स्वीकारले.त्यानंतर ठेवीदारांनी दुय्यम निबंधक कार्यालय येथे मोर्च्या वळवला आणि संपूर्ण परिसर घोषणा नी गजबजून गेला यावेळी दुय्यम निबंधक साहेब हे ठेवीदारांसमोर आल्यानंतर ठेवीदारांनी निवेदन दिले,
मे.साहेबानी निवेदन स्वीकारल्यानंतर ठेवीदारांनी प्रश्नांची सरबत्ती केली त्यावेळी मे साहेबानी सांगितले. की मी सहकार आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे. त्या दृष्टीने चौकशी चालू आहे.लवकरच जशी माहिती मिळेल तशी कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी या मोर्च्या चे नेतृत्व सारंग पाचपुते व आशा ताटे यांनी केले यावेळी डॉ पाचपुते,प्रीतम पाचपुते, शर्मिला निर्हाली,जुनेद शेख आदि खूप मोठ्या प्रमाणात ठेवीदार उपस्थित होते.
🟣🔴🟢🟠
