बिसलेरी दरामध्ये तिपटीने वाढ; नागरिकांची तहान भागेना
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार,१५ मार्च २०२६
श्रीगोंदा : सध्या श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील गावागावांत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या (बिसलेरी) दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नामांकित कंपन्यांच्या ऐवजी स्थानिक ब्रँडच्या नावाने तयार केलेल्या पाण्याच्या बाटल्या बाजारात मोठ्या प्रमाणावर विकल्या जात असून त्या २० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.
माहितीनुसार, अशा बाटल्यांची घाऊक किंमत प्रति बाटली सुमारे ६ रुपयांपर्यंत असताना किमान १२ रुपये विक्री असावी दुकानदारांकडून २० रुपयांपर्यंत दर आकारला जात असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान भागविण्यासाठी प्रवासी व नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी दुकानदारांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
तसेच बाजारात विकल्या जाणाऱ्या स्थानिक ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये कोणते घटक आहेत, त्या आरोग्यास सुरक्षित आहेत का याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भेसळयुक्त पेय आणि अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
प्रशासन नियम:कमाल विक्री मूल्य (MRP) कायद्याने बंधनकारक आहे. किरकोळ दुकानांमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणे बेकायदेशीर असून त्यासाठी दंड होऊ शकतो
अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) यांनी कुठल्याही तालुक्यांत दर वाढीविषयक जबाबदारी घेतली नाही आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाचे अधिकारी यांच्यावरती कारवाई प्रथम करण्यात यावी
🟣🔴🟢🟠
