आता या दोन योजनेत आता १५०० ऐवजी मिळणार २५०० ,जाणून घ्या सविस्तर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार १९ नोव्हेंबर २०२५
मंडळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास तसेच नगरविकास विभागाशी संबंधित निर्णय घेण्यात आले.
दिव्यांगांसाठी अर्थसहाय्यात वाढ
सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी या लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये मिळत होते. मात्र आता ही मदत वाढवून २,५०० रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.