अनिल घनवट व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता!
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २० नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा येथील तत्कालीन तहसीलदार यांना मारहाण व काळे फासण्याच्या प्रकरणात अडकविण्यात आलेले अनिल घनवट व शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांना तब्बल वीस वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.
दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान पुराव्याअभावी सर्वांवरचे आरोप फेटाळले. या निकालानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अनिल घनवट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हा विजय सत्याचा आहे. शेतकरी आंदोलन नेहमी जनतेच्या हक्कासाठीच असतात, त्यात गुन्हेगार ठरवले जाणे अन्यायकारक होते.”
