अग्निपंख फौंडेशनचा स्थुत उपक्रम विमा प्रतिनिधींच्या कार्याचा केला सन्मान.
श्रीगोंदा माधव बनसुडे :- “सेवेच्या भावनेतून केलेले कार्याचा खऱ्या अर्थाने समाजाचा कणा मजबूत करते,” या विचाराचा प्रत्यय अग्नीपंख फाउंडेशनने श्रीगोंदा येथै आयोजित उत्कृष्ट विमा प्रतिनिधी सन्मान सोहळ्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल आय सी चे शाखा व्यवस्थापक संदीप धारव होते.
या विमा क्षेत्रातील एम डी आर टी हा विमा क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान पटकाविल्या बद्दल एल आय सी चे विमा प्रतिनीधी बाळासाहेब धुमाळ ,अजीत दळवी ,सतिश कुलकर्णी ,अंजना पन्हाळकर ,सुनील गिरमकर ,प्रतिभा खामकर ,निखील सुपेकर या विमा प्रतिनीधींचा सन्मानपत्र देऊन आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले कि विमा व्यवसाय हा केवळ व्यावसायिक क्षेत्र नसून, तो समाजाच्या विश्वासाचा आणि सुरक्षिततेच्या आशेचा दुवा आहे. हि जाणीव ठेवून विमा प्रतिनीधी अवघ्या समाजाच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावत असतात.
या कार्याची दखल घेत अग्निपंख फाउंडेशनने हा सन्मान सोहळा आयोजित केला. ज्यातून सेवेतील प्रामाणिकपणा आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे .
“विमा प्रतिनिधी हे समाजातील आर्थिक सुरक्षेचे रक्षक आहेत. प्रत्येक घरापर्यंत ‘आश्वासन आणि संरक्षण’ पोहोचविण्याचे कार्य ते करतात. अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाच्या आत्मविश्वासाचा गौरव आहे.
या वेळी संग्राम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले आहे .या वेळी नवनाथ खामकर ,अशोक गदादे, राजेंद्र उकांडे संगीता घोडेकर आदि उपस्थित होते.🔴🟣🟠🟢