नगरपंचायत व नगरपालिकेचे बिगुल वाजले 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल.
श्रीगोंदा माधव बनसुडे :- नगरपंचायत व नगरपालिकांचे बिगुल वाजले राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठीं मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्या आहेत. २ डिसेंबर २०२५रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगर पंचायती, ३३६ पंचायत समिती, २४६ नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.नामनिर्देशन पत्र दाखल करणे १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर ,छाननी १८ नोव्हेंबर,अर्ज माघारी घेण्याची तारीख २१ नोव्हेंबर,निवडणूक चिन्ह वाटप २२ नोव्हेबर मतदान २ डिसेंबर,निकाल ३ डिसेंबर असा राहील .
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असतील. त्यामध्ये ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण १३ हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
