भ्रष्टाचाराविरोधात अण्णा कायम मैदानात उतरणार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १३ डिसेंबर २०२५
जानेवारीपासून अण्णा करणार आमरण उपोषण। लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी हि कायम राहणार।
अहिल्यानगर : राळेगण सिध्दी राज्यात सशक्त लोकायुक्त कायदेशीर चौकट लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी करत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकारला एकवणे केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात, “कायद्याची अमलबजावणी होत नसेल तर ३० जानेवारी २०२६ पासून राळेगणसिद्धीत आमरण उपोषण करणार” ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
उपोषणांचा इतिहास
अण्णांनी यापूर्वी २०१८ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर सात दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धी येथे पुन्हा सात दिवसांचे उपोषण झाले. त्यानंतर संयुक्त मसुदा समिती स्थापन झाली आणि नऊ बैठका घेऊन लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला.
अण्णा हजारे यांची मुख्यमंत्री फडणवीसांना रोख ठोक चेतावणी
‘वैयक्तिक प्रश्न नव्हे, देशातील जनतेचा प्रश्न’ देश हिताचा प्रश्न
पत्रात अण्णा लिहितात, “भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लोकायुक्त कायदा अत्यंत आवश्यक आहे. हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही: देशहिताचा विषय आहे. हृदयविकाराने मरायच्या ऐवजी समाजहितासाठी मृत्यू आला, तर ती माझा सुदैव समजेन.” अण्णांच्या वा शब्दांमध्ये नाराजी, असंतोष आणि ठाम निर्धार स्पष्ट जाणवतो.
विधेयक मंजूर; तरीही कायदा अंमलात का नाही
या कायद्यात २८ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेत तर १५ डिसेंबर २०२३ रोजी विधानपरिषदेत मंजुरी देण्याल आली. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर २०२४ रोजी राष्ट्रपतींकडे पाठविले गेले. अण्णा हजारे म्हणतात विधान परिषदेत मंजूर होऊन दोन वर्षे झाली राज्यपालांची मान्यताहून वर्षभाराहुंन जास्त काळ लोटला तरीही लोकायुक्त कायदा बनला नाही हि सरकारची इच्छा शक्ती नसल्याची खून आहे.
३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत अमरण उपोषण
फडणवीस सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत, लोकायुक्त कायदा लागू झाला नाही, तर ३० जानेवारी २०२६ पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात ते गांधीवादी मार्गाने आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
🔴🟢🟠🟣
