स्मशानभूमी सुशोभीकरण कामात सुधारणा; पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कामाला लवकरच गती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
दि. १४ जून २०२६
तांदळी दुमाला:दिनांक १२ जून २०२६ रोजी गावातील स्मशान ककामातील दुरुस्ती श्रीगोंदा लोकप्रिय आमदार Vikram Pachpute यांच्या माध्यमातून जनसुविधा निधीतून मंजूर करण्यात आलेल्या १५ लाख रुपयांच्या स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. कामामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने ग्रामस्थ व सदस्यांनी संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती.
यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पंचनामा व चौकशी केली होती. त्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी श्री. भोसले यांनी पुन्हा एकदा कामाची प्रत्यक्ष पाहणी करून काही आवश्यक फेरबदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भविष्यात स्मशानभूमी परिसरात शेड उभारण्याची आवश्यकता लक्षात घेऊन काही झाडे काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या ब्लॉक बांधकामावर पावसाळा किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता काम अधिक मजबूत व टिकाऊ करण्यावर भर देण्यात आला आहे.
मा. उपसरपंच राजेंद्र भोस, सदस्य भरत शेळके, सदस्य अण्णा धालवडे, मा. सदस्य राजू काळेवाघ, संचालक बाबासाहेब काळेवाघ, राजू गोविंद भोस तसेच ग्रामस्थ व तक्रारदार यांच्या मागणीनुसार स्मशानभूमीच्या कामाभोवती संरक्षण भिंत उभारण्याची सूचनाही भोसले साहेबांनी दिली आहे. त्यामुळे हे काम दीर्घकाळ सुरक्षित व भक्कम राहण्यास मदत होणार आहे.
गावातील विकासकामे उच्च दर्जाची व दर्जेदार व्हावीत या प्रामाणिक हेतूने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले आहेत. आमदार विक्रम पाचपुते तसेच पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार संबंधित ठेकेदाराला आवश्यक दुरुस्ती करून काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच कामाला गती मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब शेळके तसेच चेअरमन पैलवान राजू दादा भोस उपस्थित होते. त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करत मोलाचे सहकार्य केले.
🟠🟢🔴🟣
