एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १५ जून २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या एमबीबीएस परीक्षेत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या होतकरू विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ॲड रमेश सदाशिव जठार यांची कन्या कु.शिवानी रमेश जठार हिने बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे व श्री दीपक रामदास शिंदे पूर्वा केम टेक प्रायव्हेट लिमिटेड डिव्हिजनल मॅनेजर यांची कन्या कु.अदिती दीपक शिंदे हिने एसएमबीटी कॉलेज नाशिक येथे एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीने.एमबीबीएस या कठीण अभ्यासक्रमात यश मिळवून आपल्या कुटुंबासह श्रीगोंदा तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यासाठी राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेने पुढाकार घेतला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन व शाल परिधान करून विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रकाश निंभोरे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोर, संचालक माधव बनसोडे, ॲड. रमेश जठार तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या भावी वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून त्यांनी समाजसेवेची भावना जपत आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थिनींचे कुटुंबीय उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विद्यार्थिनींनी मिळालेल्या सन्मानाबद्दल राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेचे आभार मानले व भविष्यात प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
छायाचित्र : एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करताना मान्यवर.
🟠🟢🔴🟣
