तांदळी दुमाला परिसरात पेट्रोल-डिझेल साठ्याची शक्यता; भूगर्भीय संकेतांमुळे चर्चा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
दि. २८ मे २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील परिसरात पेट्रोल, डिझेल व रॉकेलसदृश इंधनसाठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील काही भूगर्भीय संकेतांमुळे स्थानिक ठिकाणी असणारे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागात गुरुत्वीय, चुंबकीय तसेच प्रवर्तित खडकांच्या रचनेत वेगळेपणा आढळून येत असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी खोल भागातील खडकांवर दिसणाऱ्या पाण्याचा रंग निळसर असल्याचेही स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या भूगर्भीय बदलांमुळे परिसरात खनिज तेलसाठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक नागरिकांकडून शासनाने या परिसराचा वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करून पेट्रोलियम पदार्थांचा साठा आहे का, याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. भूगर्भ तज्ज्ञांकडून तपासणी झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट निष्कर्ष समोर येऊ शकणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सर्व माहिती हि गोळा करून पाहणी करणारे संपादक वैभव हराळ या ठिकाणावरील खडक आणि खडकातील पाणी अतिशय निळसर असल्याचे समजते.
🟠🟣🔴🟢
