इ पिक पाहणी अँप वरती नोंदवली जाणारी शेती पीक नोंद ओ टी पी पडतच नाही तर पीक नोंद होणार कशी शेतकऱ्यांची ओरड
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २२ जानेवारी २०२६
इ पिक पाहणी अँप वरती नोंदवली जाणारी शेती पीक नोंद हि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली (पीक नोंद ) हि दिलेल्या निर्धारित तारखेत करावी लागेल या सूचना शेतकरी वर्गास आपण दिली असली तरी यात अनेक त्रुटी आहेत. संकेत नोंदणी क्रमांकावर ओटीपी पडत नाहीच त्याच बरोबर पुढील नोंद घेण्यासाठी सबमिट देखील होत नसल्याचे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी नागरिक सांगता करत आहे.
आपण दिलेल्या तारखेस नोंद हि सर्व शेतकऱ्यांची होऊ शकणार नाही हा दिनाक २४ जानेवारी २०२६ अंतिम असून २४ तारखेच्या आत भरावा लागणार आहे.परंतु काही शेतकरी हि नोंद करू शकत नाहीत.अशा त्रुटी नोंदविणाऱ्या अँप,सर्व्हर मध्ये कार्यरत होत आहेत.अशा त्रुटी दुरुस्त करून शेतकऱ्यांना मुदत वाढ करावी.सर्वसामान्य शेतकऱ्यांची हि एक प्रकारे अडवणूकच आहे आपण दिलेल्या तारखेच्या आत प्रयत्न करूनहीं नोंद होत नाही. तरी आपण दुरुस्ती व मुदत वाढ हि कारवी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली विनंती.
🔴🟢🟠🟣
