विद्यमान नगरसेवकांना संधी दिल्यास भाजपला बसू शकतो फटका
श्रीगोंदा : – जुना प्रभाग ५ व आत्ताचा ८ व ९ मध्ये विभाजन झालेल्या प्रभागावर लोकनेते मा.मंत्री बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व असुन प्रभागात पक्ष नव्हे तर पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग आहे या प्रभागावर नेहमीच पाचपुते यांचे वर्चस्व राहिले आहे.मात्र प्रभाग ५ च्या नगरसेवकांच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत आमदार विक्रम पाचपुते यांना बसला आहे. मतदारांनी नगरसेवकांवरील नाराजी मतदानातून व्यक्त केल्याने पुन्हा त्याच उमेदवारांना संधी देणार का नव्या चेहऱ्यांना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुन्यांना संधी दिल्यास या जागा भाजपला गमवाव्या लागणार हे मात्र नक्की. या प्रभागातील मतदारांशी संपर्क साधला असता पक्ष नव्हे तर उमेदवार पाहून मतदान केले जाणार असल्याचे मतदारांनी सांगितले. या प्रभागातील रस्ता व लाईट सह अनेक प्रश्न प्रलंबित असून या प्रश्नाकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रभागात अनेक तरुण इच्छुक असून भाजपाने तरुणांना संधी दिल्यास भाजपची ताकद वाढणार हे मात्र नक्की. इच्छुकामध्ये प्रभाग नऊ किरण बनसुडे, शिवाजी खेतमाळीस, सागर गोरे,अंबादास मखरे, शांताराम पोटे, शेखर मखरे, मनीषा आनंदकर ,ज्योती खेडकर, छाया बनसुडे तर प्रभाग आठ मध्ये ऋषिकेश (बंटी) बोरुडे, विकास बोरुडे, एमडी बोरुडे, भाऊसाहेब मखरे ,सतीश मखरे, कालीचरण मखरे, एस पी मखरे ,अपेक्षा किरण मखरे यांचा समावेश आहे. किरण बनसुडे यांची यंत्रणा कामाला लागली असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद व पाठिंबा मिळत असल्याने नागरिकांच्या आग्रहाखातर उमेदवारी करणारच असा ठाम विश्वास किरण बनसुडे यांनी व्यक्त केला.
चौकट
नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आल्याचे बोलले जात आहे मात्र नगरसेवकच ठेकेदार असल्याने कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने प्रत्यक्षात काम दिसत नाही पुन्हा नगरसेवक ठेकेदार आणि ठेकेदार पुन्हा नगरसेवक झाल्यास शहराचा विकास होईल का? अशा चर्चा नागरिक करत आहेत.
