शेतकरी संतापला कांदा गाडीच्या खाली उतरेना नेप्ती कृषी बाजार बंद ठेवण्यात आला.
शेतकरी बाजार भाव आंदोलन पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ४ जानेवारी २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ
अहिल्यानगर:कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती वार शनिवार दिनाक ३ रोजी बंद ठेवण्यात आले. याचे मुख्य कारण कांदा आवक जास्त प्रमाणात वाढल्याने एक दिवस बंद पुकारण्यात आले. बीड, कर्जत, श्रीगोंदा, राहुरी, राहता, सुमारे महिंद्रा पिकअप ३,५०, व २०० ट्रक वाहने जागीच उभा ठेवण्यात आली.
व्यापारी कमी आल्याने व व्यापाऱ्यांना माल जास्त प्रमाणात वाढल्या मुळे पैसे हे कमी असल्याने शनिवार वारी शेतकऱ्यांची तुंबळ उडाली.
याच बरोबर व्यापारी हे या मार्केट मध्ये कमी खरेद करत असल्याचे दिसून आले. शेतकरी हा निराश होऊन जागीच बसला. शेतकऱ्याचा जणू काय खुबाचा मोडला जणू त्याची तहानच जिरली अश्या पद्धतीने शेतकरी गारठ्यात उघड्यावर झोपवून काकडा सोसावा लागला आहे. शेतकऱ्याच्या मालाला किमती संगे जागीचं गोण्यात ठेवावे लागले.
कांदा बाजार भाव हे उतरत्या क्रमांकावर आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून शेतकरी भरघोस उत्पादन घेऊन सुद्धा पिकाला पुरेसा भाव व मागणी नसल्याने कांदा माल गाड्या जागीच ठप्प झाल्या आहेत. कांदा पिकाला पुन्हा एकदा औषधे देऊन कांदा चाळीत ठेवावे लागणार आहे. शेतकरी हा उत्पन्न चांगल्या पद्धतीने करू लागल्याने कांद्याची आवक जास्त झाली. कृषी मंत्री यांनी आपल्या शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. याच्यावरती निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या सरकारने शेती मालावर जास्त लक्ष द्यावे असे ही मत अहिल्यानगर मधील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समितीत आम्ही दाखवून देणार आहोत जर शेतकऱ्याची नास धूस होत असेल तर शेतकरी आता गप्प बसणार नाहीये सरकारने विचारत घ्यावे. बाजाराची चढ उताराबरोबर विक्री हि बंद करण्यात येते याचे भान हे सरकारने ठेवावे आमचा माल हा मालवाहतूक गाडीचे भाडे भरून घरी ठेवावे लागणार आहेत का शेतकऱ्यांनी सरकारला केला सवाल
🔴🟢🟠🟣
