शेतकऱ्यांना करावा लागला ओल्या दुष्काळाशी सामना, सरकाचे अनुदान नाममात्र
जिल्हा प्रतिनिधी:पावसामुळे मका गेल्या ज्या आल्या त्यांना बाजार मुबलक प्रमाणात मिळाला नाही. कांद्याची रोपे जाळून गेली याने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून दिवाळीमध्ये किराणा दुकानदारांची पहिल्याप्रमाणे वसुली झालेली नाही. आणि पहिले खातेदार हे पुन्हा दुकानावरती आले नाही. कपाशी व कापूस काळा झाला याने बजार कमी होतो.
गव्हाची पेरणी लांबलीवर पडली.पुढील चिंता शेतकऱ्यानं भासू लागली.शेतकरी हतबल झाला आहे.काहीना अनुदान मिळाले तर काहींना मिळाले नाही.त्यात व्यापारी माल खरेदीसाठी कमी आले शेतकरी वर्गातून बाजारभावांना शेतीच्या बाजारभावांना फटका बसल्यामुळे शेतकऱ्याकडे पैशाची कमतरता भासल्याने किराणातील माल सुद्धा खरेदी करू शकले नाहीत .याच्यामुळे किराणा दुकानदाराची पहिल्या प्रमाणे वाढणारी गर्दी व लागणाऱ्या वस्तू या कमी प्रमाणात विकल्या गेल्या दर सालाप्रमाणे दिवाळी साजरी होऊ शकली नाही.
दोन पिके वाया गेली. कांदा उत्पादक कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काळा पडलेल्या कापसाचे भाव घसरण्याची शक्यता. या वर्षी शेतकऱ्यांचा ओला दुष्काळाशी सामना करावा लागला असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. सरकारचे अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहच होण्याची गरज .