तहसील–पोलीस स्टेशनदरम्यान अडचणीचा मार्ग, नागरिकांना गैरसोय — सामाजिक कार्यकर्ते सत्यवान शिंदे यांचा तहसीलदारांकडे अर्ज.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा (प्रतिनिधी): तालुक्यात तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन कमी अंतरावर असतानाही तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या बांधकाम व सुभिकीकरणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या अडीच ते तीन फुट उंच बांधकामामुळे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन तसेच खरेदी-विक्री कामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग बांधवांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत आहेत.
या ठिकाणी सुरक्षित व सोयीचा रस्ता न ठेवता भिंती उभारल्याने नागरिकांना धोकादायक पद्धतीने चढ-उतार करावा लागत आहे. ही बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामचंद्र शिंदे (रा. आढळगाव) यांनी तात्काळ श्रीगोंदा तहसीलदारांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य प्रकारे दुतर्फा ये-जा होण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात कोणताही अपघात होऊ नये म्हणून तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांनीही तालुका प्रशासनाने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देऊन त्वरित योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.यावरून श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांनी pwd अधिकारी होके यांना पत्र देऊन सूचना करू व काम पूर्ण करण्याचे आश्वासन शिंदे यांना दिले.
🔴🟠🟣🟢
