खरे शिवराय जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे – डॉ रफिक सय्यद
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळावर २७ जानेवारी २०२६
जिल्हा प्रतिनिधी:(श्रीगोंदा) कोणाच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या असा संदेश देणारे रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या राज्यात सर्व धर्माचा आदर होता , सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहत होते . मंदिर – मसजिद सुरक्षित होते. कोणाच्याही धर्मस्थळाला हात लावू नये हा कडक आदेश होता .स्त्रियांना सन्मानाची वागणूक होती , अपमान केल्यास कठोर शिक्षेची तरतूद होती .शिवाजी महाराज न्यायी ,धर्मनिरपेक्ष व प्रजावत्सल होते .मात्र मूठभर लोकांनी महाराज मुस्लिम विरोधात होते असा चुकीचा इतिहास दाखवून वातावरण कलुशीत केले आहे तेव्हा खरे शिवराय जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत थोर विचारवंत व सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच चे संस्थापक डॉक्टर रफिक सय्यद यांनी श्रीगोंदा येथे बोलताना व्यक्त केले .
सावित्री फातिमा सद्भावना मंच , समविचारी नागरिक व उत्सव समितीच्या बैठकीत ते बोलत होते . बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शकीलभाई शेख होते .
डॉ .सय्यद पुढे म्हणाले शिवाजी महाराज सर्वांचेच आदर्श आहेत . सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले होते . त्यांचा औरंगजेबाशी लढा धर्मासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी होता . त्यांच्याकडे अठरापगड जातीचे मावळे होते .त्यांचे अंगरक्षक व अत्यंत विश्वासू यामध्ये मुस्लिम मावळ्यांचा समावेश होता . मात्र त्यांचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास दाखवण्यात मुठभर लोक यशस्वी झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे खरे शिवराय जनतेसमोर आणण्याची गरज असून महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हे कार्य करण्यात येणार असल्याचे डॉ . सय्यद यांनी सांगितले .
सावित्री फातिमा सद्भावना विचारमंच चे अध्यक्ष ॲड . संभाजी बोरुडे यांनी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना या आदर्श राजाने माणसे जोडण्याचे काम केले ,सर्वांना बरोबर घेऊन राज्य केले . कोणाचे नुकसान होईल ,भावना दुखावतील असे काम केले नाही व कोणास करूही दिले नाही प्रसंगी जवळच्या लोकांना शिक्षाही दिल्याचा इतिहास आहे . आपण त्या राजाची , जयंती ‘ आदर्श ‘ म्हणूनच साजरी केली पाहिजे असे अपेक्षित असताना केवळ डी .जे .सारखे वाद्य वाजवणे ज्यामुळे लहान बालकांना , वृद्ध माणसांना त्रास होईल असे न करता व्याख्याने , विविध स्पर्धांचे आयोजन करावे जेणेकरून विद्यार्थी , तरुणांना महाराजांचा इतिहास कळेल , स्पूर्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली .
ते म्हणाले शिवाजी महाराजांचे खरे चरित्र अजूनही समाजासमोर गेले नाही चुकीच्या इतिहासाची मांडणी झाली त्याचे दुष्परिणाम आपण आता लोकशाहीमध्ये भोगत आहोत . परिवर्तनाची गरज आहे आज देशात वाईट परिस्थिती आहे राजकीय माध्यमातून जास्त प्रदूषण झालेले आहे . द्वेष भावना तयार झाली आहे मतभेद तयार झाले आहेत . आग लागली आहे याला आवर घालायचा असेल तर आपणही चोचीतून पाणी टाकण्याची गरज आहे . मोहम्मद पैगंबर व महापुरुषांनी सांगितले आहे
माणसे जोडण्याचे काम करा याच्याइतके पवित्र काम नाही . मुठभर लोक चुकीचे सांगून द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत . लोकांना सत्य सांगण्याची गरज आहे . सत्य समजल्यानंतर ते ‘ मूठभर ‘ उघडे पडतील आपण सत्यशोधक पद्धतीने काम केले पाहिजे असे ते म्हणाले .बैठकीत विचारवंत व पत्रकार विजय चव्हाण , मुकुंद सोनटक्के ,लांडगे महाराज , भीमराव कोथिंबीरे आदींनी सूचना व मनोगत व्यक्त केले . बापुराव औटी , डॉ .राजेंद्र डाळिंबे , ॲड . महेंद्र शिंदे , फिरोज मालजपते , आनंदकर , पिनू भैलुमे ,भगत ,सौ. ताडे , दांडेकर आदींसह सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच चे पदाधिकारी व समविचारी नागरिक उपस्थित होते .
🔴🟢🟠🟣
