महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात संविधान दिन साजरा.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ७ डिसेंबर २०१५
श्रीगोंदा :- संविधान दिन हा भारतीय लोकशाही संस्कृतीचा गौरव करणारा दिवस आहे. विविधतेतून एकतेचा संदेश भारतीय संविधान देते. स्वातंत्र्य, समता, बंधुता , विज्ञाननिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवरच भारतीय लोकशाही समृद्ध बनली आहे ,असे विचार उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे यांनी व्यक्त केले. ते महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आयोजित संविधान दिन प्रसंगी बोलत होते. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो .डॉ. महादेव जरे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अर्चना फुलारी, निवडणूक साक्षरता मंडळाचे प्रमुख, नोडल अधिकारी प्रो. डॉ. राजेंद्र ठाकरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.
भाऊ बुलाखे, प्रा.देवेंद्र बहिरम , प्रा. संजय फटे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुदाम , भुजबळ, डॉ. राहुल गायकवाड, प्रा. रमेश थोरात, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. सुप्रिया पवार, प्रा . उंडे, प्रा.ससाणे, प्रा.इंगळे,प्रा. सिद्धार्थ बर्वे,प्रा.वैशाली घोडके, प्रा .रायकर, प्रा. नाना वागस्कर, प्रा शेंडगे आदी सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक प्रा.संजय फटे यांनी केले.राष्ट्रगीताने संविधान दिनाची सांगता करण्यात आली.
🔴🟢🟠🟣
