मनसे पुन्हा एकदा पंचायत समिती गाजवणार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार, १३ मार्च २०२६
हराळ लढणार मनसेकडून पंचायत समिती निवडणूक!बी जी पी सह आमदार यांना आव्हान खुलेआम
श्रीगोंदा : आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव हराळ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कार्यकर्ते सक्रिय झाले असून विविध गावांमध्ये बैठका, जनसंपर्क दौरे आणि नागरिकांशी संवाद यावर भर दिला जात आहे.
स्थानिक पातळीवरील रस्ते, पाणी, वीज तसेच शेतकऱ्यांच्या समस्या यावर ठोस भूमिका घेऊन मनसे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. युवकांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्षाचा विशेष भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव हराळ यांनी पत्रकारितेद्वारे आणि सामाजिक कार्यातून अनेक स्थानिक प्रश्नांवर आवाज उठविला आहे. रस्त्यांमधील त्रुटी, अपूर्ण कामे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अपघात टाळण्यासाठी सुरक्षेची कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याशिवाय विविध जनसंवाद कार्यक्रमांद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे देणे, घरकुल योजना तसेच बालकामगार आणि गरजू कुटुंबांना मदत करण्याचे सामाजिक कार्यही त्यांनी केले आहे.
आमदार खासदार आणि बी जी पी कार्यकर्ते यांना आव्हान देत निवडून येणार असल्याबाबत शर्यत आव्हान
भ्रष्टाचाराविरोधात लढा देत “भ्रष्टाचारमुक्त भारत” अभियानही सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत टेंडर प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विकासकामे पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठीही त्यांनी प्रयत्न केले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यामुळे येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा दमदार कामगिरी करेल, असा विश्वास मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
नोटीस; गुंड,भ्रष्टाचार, आणि आतगवाद थांबविण्यास प्रयत्न, शाळेतील मुलांना हातापाई करण्यापासून थांबवणे, अन्न भेसळ पदार्थ थांबविण्यात प्राधान्य,पोलिस,तहसील, आणि वन विभागाचे कामे पूर्ण करून देण्यास हात,
मशनीत घोटाळे करून दाखवावे तुमची गाठ शिवसैनिकाशी आहे. आजपर्यंत भ्रष्टाचार आणि हेराफेरी करणाऱ्यांनी समजून घ्याव.
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणी प्रमाणे कामे करणारा उमेदवार वैभव हराळ
🟣🔴🟢🟠
