कार्तिकी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित हभ.प आबासाहेब नवले महाराज यांनी वारीतील प्रत्यक्ष अनुभव सांगितले.
महाराष्ट्र प्रतिनिधी:जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥कार्तिकी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे अनेक वर्षापासून लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे पंढरीचा पांडुरंग देव दर्शनासाठी जातात. याही वर्षी सात लाख वारकऱ्यांनी दर्शन घेतले. आजही पांडुरंग भेट देतो वारकरी भक्ताला श्रद्धा भाव भक्ती पाहिजे. असे आबासाहेब नवले महाराज यांनी म्हटले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव ह.भ.प आबासाहेब नवले महाराज यांनी सांगितलेअसता माझ्या गळ्यात तुळशीचा पडलेला हार त्या भक्तला भक्तीची भेट मिळाली.
ह भ.प आबासाहेब महाराज नवले यांचा श्री क्षेत्र तांदळीश्वेर येथे संत न्यानेश्वर महाराजांचा हरिपाठ चालू असून किर्तन प्रवचन अभ्यास त्यांनी रात्री दोन ते पहाटे पाच या वेळेत सुरू ठेवलेला आहे. त्यांच्या जीवनात अनेक कठिण प्रसंग आले. त्यातील एक प्रसंग करोना सारखा आजार होऊन सुद्धा मी या प्रसंगातून बाहेर पडलो ते फक्त पंढरीचे पांडुरंग व रुक्मिणी माता यांच्या तुळशीच्या माळे मुळेच संत न्यानेश्वर माऊली, संत जगद्गुरू तुकाराम महाराज माझे गुरू वैकुंठ, वासी तात्या महाराज , ओम चैतन्य आत्मागिरी महाराज, वैकुंठ ह.ब.पभिकाजी नाना यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रात किर्तन प्रवचन व संत कथा व संत कथा चालू आहेत.
मी दर वर्षी आषाढी कार्तिकी वारी करतो. त्याच बरोबर व्यसन मुक्ती संघटनेत गेले तीस वर्षे काम करून कितेकांचे व्यसन या संघटनेतून व्यसन मुक्त करण्यात आले. त्याच बरोबर पाच ऑक्टोबरला आध्यात्मिक पुरस्कार देऊन सत्कार देखील करण्यात आला. हा जीवनाचा व भक्तीचा प्रवास असाच चालू राहो हिच त्या पांडुरंगास प्रार्थना
किर्तनासाठी आमच्याशी संपर्क मो.८७९३२२६३६१ पत्ता तांदळी दुमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा.अहिल्यानगर
