फोटो शूट कॅमेऱ्यासह फोटो हि गायप ! कॅमेरा घेण्यासाठी फोटोग्राफर वरती लोखंडी वार करून फरार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ५ जानेवारी २०२६
श्रीगोंदा:फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना लोखंडी रॉड व प्लास्टिक पाईपने जबर मारहाण केल्याची घटना शनिवार ३ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहराजवळील वडळी रस्त्यावर घडली यात मारहाण करणाऱ्यांनी या तरुणांना फक्त मारहाणच केली नाही तर त्यांच्याकडील तीन लाख रुपये किंमतीचा कॅनोन आर कंपनीचा कॅमेरा त्याची लेन्स तसेच ३८ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले आहेत.
सदर चोरी व जबर मारहाणीच्या घटनेबाबत ओम संतोष शिंदे रा बुरुडगल्ली, श्रीगोंदा या फोटोग्राफर तरुणाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु दिवसा ढवळ्या तरुणांना मारहाण करुन त्यांच्याकडील मुद्देमाल चोरून नेल्याच्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे
सदर घटनेबाबत समजलेली माहिती अशी की काल दुपारी फोटोग्राफर ओम शिंदे याला एका तरुणीने फोन करुन तीन मैत्रिणींचे फोटोशूट करण्यासाठी श्रीगोंदा शहरानजीक असलेल्या वडाळी रस्त्यावर बोलावले त्यानंतर ओम हा त्याचे मित्र अजय दिलीप बोके रा. कोकणगाव व अनिकेत अंबादास धोत्रे रा. श्रीगोंदा यांना सोबत घेऊन तीन तरुणींचे फोटोशूट
धोत्रे रा. श्रीगोंदा यांना सोबत घेऊन तीन तरुणींचे फोटोशूट करण्यासाठी वडाळी रस्त्यावर गेला त्या ठिकाणी फोटो काढत असतानाच एका विना नंबर च्या काळ्या रंगाच्या बुलेटवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी व विना नंबर चारचाकी मधून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फोटोग्राफर ओम शिंदे व त्याचे दोन मित्रांना शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्या तसेच लोखंडी रॉड व प्लास्टिक पाईपने मारहाण केली.
त्यानंतर कॅनोन कंपनीचा कॅमेरा, लेन्स रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला या मारहाणीत तिनही तरुण जखमी झाले आहेत.पोलीस मारहाण करणाऱ्या गँगस्टार चा शोध घेत आहेत. या प्रकरणात गुपित रहस्य उघडकीस येऊ शकते. हा खुनशीचा प्रकार हि असू शकतो का असा सवाल उपस्थित होत आहे. चोरी करणारे दिवसा चोरी करतात का हे सुधा तपासात तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. अशी काही प्रकरणे या आदी सुद्धा पोलिस स्टेशन मध्ये नोंद होत आहेत जे खुनशीची व बदल्याची असतात.
सूचना: चोरीच्या उद्देशाने मारले आहे. का आणखी काही बदला तर नाही ना घेतला.
🔴🟢🟠🟣
