श्रीगोंद्यात पकडलेल्या गुटखा प्रकरणावर अफवांवर विश्वास ठेवू नये; चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा | १६ जून २०२६
पेडगाव रोड परिसरात अलीकडेच पकडण्यात आलेल्या गुटखा मालासंदर्भात विविध प्रकारच्या चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संबंधित मालावरील सांकेतिक अंकांच्या आधारे काही व्यक्तींनी पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करण्याचा प्रयत्न केला असला, तरी या अंकांचा संबंध नेमका कोणाशी आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही अधिकारी अथवा व्यक्तीला दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. संबंधित गुटखा विक्रेत्याकडूनही अद्याप अशा कोणत्याही आरोपांची कबुली देण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे.
श्रीगोंदा शहरात राजकीय वातावरण तापलेले असल्याने विविध दावे आणि अफवा पसरवल्या जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र ठोस पुरावे आणि अधिकृत तपास अहवाल समोर येईपर्यंत नागरिकांनी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच, सामाजिक माध्यमे किंवा अन्य माध्यमांद्वारे अप्रमाणित माहिती प्रसारित करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून वस्तुनिष्ठ वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(टीप : कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकाऱ्याविरुद्ध आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी मानता येत नाही. त्यामुळे अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.)
नियमांचे उल्लघन करणाऱ्या: सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांची बदनामी व त्रास देणाऱ्यास किमान ३ वर्ष ते ५ वर्ष जेल होऊ शकते.
पुरावे बद्दल माहिती: शूटिंग आणि दिनांक, संबंधित रेड झाल्याबाबत लिखापड केलेला दस्तावेज, त्या संबंधित अधिकारी यांची सही. किंवा रेड टाकलेल्या जागेचा मालक विक्रेता
न्यायालयीन कारवाई: न्यायालय ठोस पुराव्यांची मागणी करते,
🟠🟢🔴🟣
