कराड येथे होणाऱ्या मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक अधिवेशनाला बहु संख्येने उपस्थित रहा-प्राचार्य बी. टी. मखरे
श्रीगोंदा माधव बनसुडे :- २५ व २६ आक्टोबर २०२५ रोजी कराड येथे होणाऱ्या ६४ वे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शाळा संघ मुंबई वार्षिक अधिवेशनाला श्रीगोंदा तालुक्यातील मुख्याध्यापकांनी उपस्थित राहवे असे आवाहन. श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य बी टी मखरे यांनी केले आहे.
प्राचार्य मखरे यांनी सांगितले की आपले मुख्याध्यापकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे साहेब, नामदार शंभूराज देसाई, पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, खासदार सुप्रियाताई सुळे हे मान्यवर मंत्रीअधिवेशनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य सचिन नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक अधिवेशन होणार असून नविन मुख्याध्यापकांना नियमांचे उकल होणार आहे. आपल्या पदासाठी आपण सक्षम बनावे यासाठी या अधिवेशनाला उपस्थित राहावे तसेचआपण आपला अधिकार निर्भिडपणे मांडण्यासाठी, आपले कर्तव्य व्यवस्थीत पार पाडण्यासाठी याच अधिवेशनात आपल्याला माहीती मिळणार आहे.
तरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी या ऐतिहासिक अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित सर, सचिव मिथून डोंगरे सर, उपाध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी, सचिव सुनील भोर यांनी केले आहे.🟢🔴🟠🟣
