प्रा. विक्रम कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
श्रीगोंदा माधव बनसुडे :- श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील साईकृपा कला महाविद्यालय येथे मराठी विषयाचे प्राध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे साहित्यिक, कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत अशी ओळख असलेले प्राध्यापक विक्रम कांबळे यांना जेजुरी येथील स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्था जेजुरी ,पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सिने अभिनेते देवदत्त नागे व मंगेश गोणे प्रमुख विश्वस्त,श्री मार्तंड देवस्थान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जेजुरी येथे रविवार झालेल्या जय मल्हार नाट्यगृह जेजुरी येथे हा कार्यक्रम आयोजित आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव कोलते मा जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे व प्रमुख पाहुणे डॉ. दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे हे होते.
प्रा. कांबळे प्रभावी व प्रखर वक्ते म्हणून ते राज्यात प्रसिद्ध असून त्यांचे विविध विषयावर वैचारिक लेख ,राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रसंत संत रविदास ,संत गाडगेबाबा व आधुनिक भारताचे शिल्पकार फुले शाहू आंबेडकर ही त्यांची पुस्तके प्रकाशित असून यापूर्वी त्यांना राष्ट्रीय स्तरावरील साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरावरील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, समाज प्रबोधनकार पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार ,समाज भूषण पुरस्कार, आणि राज्य स्तरावरील स्वाभिमानी धम्म पुरस्कार यासह विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल थेरवडी सेवा संस्थेचे चेअरमन मोहनराव गोडसे, सरपंच उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य सेवा संस्थेचे व्हाइस चेअरमन व सर्व संचालक तथा साईकृपा कला महाविद्यालय सर्व प्राध्यापक दत्तकृपा शैक्षणिक संकुलातील सर्व स्टाफ, दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. दत्तात्रेय पानसरे सचिव मा.अर्चनाताई पानसरे व कल्याणजी शिंदे.. सर्व विभागाचे प्राचार्य आणि थेरवडी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
