श्रीगोंदा नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा नगराध्यक्ष पदी श्रीमती सुनिता संतोष खेतमाळीस विजयी .
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २१ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा माधव बनसुडे :– श्रीगोंदा नगरपरिषदेच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या श्रीमती सुनिता संतोष खेतमाळीस यांनी विद्यमान नगराध्यक्षा सौ.शुभांगी मनोहर पोटे यांचा पराभव करत नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला .
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या २२जागापैकी १३ जागांवर विजय मिळवित नगरपरिषद भाजपच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.मात्र भाजपच्या मातब्बर उमेदवार माजी नगराध्यक्षा श्रीमती छायाताई गोरे व माजी उपनगराध्यक्ष श्री अशोक खेंडके यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
तर राष्ट्रवादी कॉग्रेस व महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.सुरवातीला भाजप ,शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस व महाविकास आघाडी अशी चौरंगी वाटणारी निवडणुक अंतिम टप्प्यात दुरंगी झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
पहिल्या फेरीत पासुनच भाजपने आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांनी फटाके व गुलालाची उधळण करत आताषबाजी केली. २२ जागा पैकी ९ जागांवर शिवसेनेला यश मिळाले .विजयी उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष. सुनिता खेतमाळीस भाजप विजयी नगरसेवक प्रभाग क्र.१. पल्लवी पांडुरंग पोटे (शिवसेना) राजेंद्र खेडकर (भाजपा)
प्रभाग क्र.२. सुशिलकुमार शिंदे (शिवसेना) चांदणी दिलीप खेतमाळीस (भाजपा) प्रभाग क्र. ३.एम. डी. शिंदे (भाजपा) अनिता दादा औटी (शिवसेना) प्रभाग क्र. ४. अनिल औटी (शिवसेना) वंदना संग्राम घोडके (भाजपा) प्रभाग क्र.५. अखत्तर शेख (शिवसेना) दिपाली बोरुडे (शिवसेना)
प्रभाग क्र. ६. सोनाली सागर गोरे (भाजपा) डॉ. अनिल घोडके (भाजपा) प्रभाग क्र. ७. अश्विनी प्रवीण काळे (भाजपा) अलका सुनिल अनभुले (भाजपा) प्रभाग क्र. ८. ऋषिकेश (बंटी) बोरुडे (शिवसेना) कोमल विकास बोरुडे (भाजपा) प्रभाग क्र.९. मनिषा विठठल (नाना) आनंदकर (भाजपा) शहाजी तुकाराम खेतमाळीस (भाजपा)
प्रभाग १० – प्रशांत गोरे (भाजपा) मिरा शिंदे (भाजपा)
प्रभाग क्र.११ भामाबाई कोथिंबीरे (शिवसेना) श्रीकृष्ण (बाबूशेठ) धुमाळ (शिवसेना) २२ पैकी भाजप १३तर शिवसेना ९ जागांवर विजयी झाले
🔴🟢🟠🟣
