येळपणे गटातील गणामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण;अमोल बोरगे हे प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत
जिल्हा प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गटातील गणामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण लागू झाले असून, या गणामध्ये अमोल किसन बोरगे हे नाव प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
पत्रकार आणि सामाजिककार्यकर्ताम्हणून परिचित असलेले अमोल बोरगे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध शासकीय योजनांमधून त्यांनी सामान्य जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्याअसून, त्यामुळे येळपणे गणात त्यांना व्यापक जनाधार लाभत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कुस्ती व पत्रकार क्षेत्रा मुळे त्यांचा मित्रपरिवार त्यांचा मोठा आहे.
अमोल बोरगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, “अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाल्यास मी निश्चितच निवडणूक लढवेल आणि गावोगाव विकासाच्या नव्या वाटा निर्माण करीन.” ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच शेती, शिक्षण, रोजगार आणि पाणीपुरवठा या क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
अमोल बोरगे हे ढवळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (डिजिटल मीडिया विभाग चे ते श्रीगोंदा तालुका अध्यक्ष असून, त्यांनी अनेक दलित संघटना व सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे दोन वेळा आंदोलनांमध्ये सहभागी होऊन समाजाचे प्रश्न सरकारसमोर मांडले आहेत.
पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे ते अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नव्हते. त्यामुळे ते येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षात सामील होतील का, की अपक्ष म्हणूनच लढतील, याकडे संपूर्ण येळपणे गट व गणाचे लक्ष लागले आहे. अमोल बोरगे यांचा यळपणे गणा मधील गावांमध्ये मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रपरिवार आहे .
स्थानिक नागरिकांच्या मतानुसार, अमोल बोरगे हे अनुसूचित जाती आरक्षित गणामधील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.
चौकट– येळपणे गणा मध्ये भाजप अनुसूचित जाती च्या आरक्षित जागेसाठी नवीन चेहऱ्याची चाचपणी करीत आहे व येळपणे गणातील गावांमधील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमोल बोरगे यांची उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे मागणी करताना दिसत आहे त्यामुळे अमोल बोरगे यांची भाजपकडून उमेदवारीसाठी वर्णी लागू शकते अशी भाजप च्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे.