किरकोळ विक्रेत्यांकडून कांदा विक्रीला वेग; शेतकऱ्यांचा संताप कायम
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार, २ एप्रिल २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या कांद्याचे दर कमी असल्याने नवीन चित्र पाहायला मिळत आहे. किरकोळ विक्रेते आता थेट कांदा खरेदी करून गावोगावी विक्री करत फिरताना दिसत आहेत. कमी दरात कांदा उपलब्ध होत असल्याने अनेक युवकांनी हा व्यवसाय सुरू केला असून ग्राहकांनाही तुलनेने स्वस्त दरात कांदा मिळत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना मात्र याचा अपेक्षित फायदा होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. व्यापारी कमी दरात कांदा खरेदी करत असताना किरकोळ विक्रेत्यांना काही प्रमाणात नफा मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारपेठेत स्थानिक पातळीवर वेगळे आर्थिक चक्र तयार होत आहे.
कोरोना काळातील परिस्थितीची आठवण करून देणाऱ्या या घडामोडींमुळे कृषी उत्पादनाच्या विक्री व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाहेरील राज्यात जाणाऱ्या पिकांप्रमाणेच स्थानिक बाजारातही दरातील अस्थिरता कायम असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत कर्जमाफीबाबत स्पष्टता मागितली आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, तसेच कोणत्या निकषांवर कर्जमाफी दिली जाणार याबाबत ठोस माहिती नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
याशिवाय, हमीभावाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने त्यांचा आर्थिक तोटा वाढत आहे. पाटबंधारे विभागाकडून वेळेत पाणी न सोडल्याने शेती उत्पादनावरही परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
राज्यभरातील शेतकरी सरसकट कर्जमाफीची मागणी करत असून, शेतीवरील कर वसुली थांबवावी, अन्यथा आगामी काळात सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सूचना :कांदा विक्री करू नये १५ दिवस
सरकार बाजार विषय ठोस भूमिका घेत नसून कर आकारण्यात अव्वल
