तांदळी दुमाला परिसरात बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ११ मे २०२६
मुख्य संपादक :
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जात असतानाही बिबट्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
आज सकाळी हराळ वस्ती येथे बिबट्याने दोन पाळीव शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तांदळी दुमाला परिसरात बिबट्याचे वास्तव्य कायम असल्याने शेतकरी, गोवंश तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषतः शाळकरी मुले आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “हा बिबट्या भविष्यात मानवी जीवितालाही धोका निर्माण करू शकतो का?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी केवळ पंचनामे करून थांबत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वन अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी तांदळी दुमाला ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सूचना: संबंधित अधिकारी यांनी बिबट्या या प्राण्याला पकडण्यास पिंजरा लावावा.
विशेष सूचना:कारवाईचे आदेश न दिल्यास मी केंद्रीय पत्रकार आपणास विशेष कारवाई करत. गुन्हे दाखल करण्यासाठी केंद्र सरकार कडे मागणी करत आहे. हा सर्व मजकुर केंद्र सरकारकडे पोहोच होत असतो.
आमचे अधिकार: सर्व केंद्र सरकार द्वारा प्रमाणित पत्रकार
🟣🔴🟢🟠
