दारूबंदी, भूमिहीनांना जमीन व खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी बसपाचे श्रीगोंद्यात आंदोलन व आमरण उपोषण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ११ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी:बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे आंदोलन व उपोषण करण्यात आले. विविध सामाजिक व न्यायाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात संपूर्ण हातभट्टी विदेशी दारूबंदी लागू करावी, सर्व भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी प्रत्येकी पाच एकर जमीन मोफत द्यावी तसेच अतिक्रमणित जमिनी संबंधितांच्या नावावर कराव्यात, तसेच सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशा मागण्या (तहसिलदार) सचिन डोंगरे,पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना करण्यात आल्या.
तसेच कोकणगाव येथील रजपूत खून प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रजपूत कुटुंबीयांनीही आमरण उपोषण सुरू केले. प्रशासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सुनील ओहळ, मुकुंद सोनटक्के, वसंत सकट, भीमराव घोडके, संजय रनसिंग, नितीन जावळे, अंबादास घोडके, सतीश जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देत उपोषण करते यांनी उपोषण आश्वासनानंतर मागे घेतले. यावेळी नायब तहसीलदार मिलिंद जाधव उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन नियम लागु
१)मुख्य समस्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क यांचा परवाना हॉटेल धारकास असल्यास ➡️दुकाने दारू विक्री वरती बंदी घालू शकत नाहीत.
२)दारू विक्री परवाने नाहीत अशा हॉटेल वरती पोलिस कारवाया करू शकतात
३) राज्य उत्पादन शुल्क यांचा मुख्य रोल समाविष्ट लोकल विक्रीला न तपासणे
निवेदनास अधिकारी यांचे उत्तर : श्रीगोंदा पोलिस मुख्य अधिक्षक किरण शिंदे यांनी १९ हातभट्टी दुकाने उध्वस्त करून २५ कारवाया आंदोलन, उपोषण होण्या अगोदर केलेल्या आहेत. तसेच विदेशी दारू बंदी लवकरच घालू दिले आश्वासन
