श्रीगोंदा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या कायदेविषयक सल्लागारपदी ऍड. राहुल शिंदे यांची निवड
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार १० फेब्रुवारी २०२६,
श्रीगोंदा प्रतिनिधी :– श्रीगोंदा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या कायदेविषयक सल्लागारपदी ऍड. राहुल शिंदे यांची कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
ऍड. राहुल शिंदे यांनी MALLB, DCL पदवी प्राप्त केली असून ते विविध विधी विषयात प्रवीण आहेत. त्यांना सहकारी क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या बैठकीत दिवंगत माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी संघाचे मा. चेअरमन बापूराव गायकवाड, वसंतराव सकट, दिलीप तोरडमल, मीरा शिंदे, व्हा. चेअरमन मयूर गोरखे, रेवती घाडगे, सुनील काळे, रमेश कळमकर, धनु लोखंडे, अंकुश शिंदे, विनायक ससाणे, नाना ससाणे आदी उपस्थित होते.
तसेच मा. आमदार राहुल जगताप, मार्केट कमिटीचे चेअरमन अतुल लोखंडे, उपसभापती मगरताई यांनी ऍड. राहुल शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🔴🟢🟠🟣
