तांदळी दुमाला येथे भव्य सभा मंडपास मंजुरी; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २९ मार्च २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून तांदळेश्वर मंदिरा शेजारी भव्य सभा मंडप उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी स्थानिक विकास निधीतून लोकप्रिय युवा आमदार विक्रम पाचपुते यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्र भोस व ग्रामपंचायत सदस्य भरत शेळके यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी रोहित ढोबळे यांनी नुकतीच तांदळेश्वर मंदिर परिसरात भेट देऊन जागेची पाहणी केली. यावेळी राजेंद्र भोस यांच्यासह सोसायटी संचालक निलेश शेळके व नानासाहेब दांगडे उपस्थित होते.
या कामासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या बापूसाहेब शेळके, हौसराव बोरुडे, अण्णासाहेब धालवडे, युवा नेते अजय भाऊ शेळके, माजी सदस्य राजू काळे वाघ, गोपीनाथ धावडे, बाबासाहेब काळे वाघ, चेअरमन राजू दादा भोस, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भोस तसेच इतर ग्रामस्थांचेही विशेष योगदान राहिले आहे.
तसेच जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, युवा नेते प्रताप पाचपुते यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.
दीर्घ प्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या या भव्य सभामंडपामुळे गावातील लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम (सप्ताह) तसेच इतर सामाजिक उपक्रमांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. विशेषतः गोरगरीब कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार विक्रम पाचपुते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
🟣🔴🟢🟠💪
