महाराजा कॉलेजची पैलवान श्रुतिका पवार ठरली २०२६ ची महिला शिरूर केसरी ची मानकरी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २५ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा/ प्रतिनिधी
दिनांक २० ते २२ फेब्रुवारी रोजी कोरेगाव येथे पार पडलेल्या शिरूर केसरी २०२६ कुस्ती स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, कर्मयोगी कुस्ती संकुल पारगाव व चिंचणी गावची पैलवान श्रुतिका पवार हिने महिला शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ओपन खुल्या गटांमध्ये अतिशय उल्लेखनीय व प्रेक्षणीय चार कुस्त्या करत यावर्षी शिरूर केसरी चा बहुमान मिळविला तिला एक इलेक्ट्रिक स्कुटी गाडी, चांदीची गदा व पंधरा हजार रुपये बक्षीस मिळाले.
श्रुतिकाचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पटवा, कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रकाश साळवे, पर्यवेक्षक रत्नकर झिटे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ नितीन थोरात, जिमखाना प्रमुख प्रा. रमेश थोरात, क्रीडा समितीचे चेअरमन प्रा श्रीकांत थोरात, विभाग प्रमुख प्रा रमेश भुजबळ, प्रा उषा बोरुडे, ऑफिस प्रमुख राऊत सर, सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
खेळाडूला कोच रवी बोत्रे सर, वडील भरत पवार, क्रीडा शिक्षक संजय डफळ, क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.
🔴🟢🟠🟣
