६ वर्षीय जारा शेख हिचा पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २५ फेब्रुवारी २०२६
जिल्हा प्रतिनिधी :मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.खास करून रमजान मध्ये उपासाला खुप महत्व असल्याने घरातील मोठे उपवास ठेवत असल्याने मोठ्यांचे अनुकरण करत कर्जत शहरातील भांडेवाडी येथील चिमुकल्या जारा आमिर शेख
(वय वर्षे 6) या मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.पहाटे सुमारे ५.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत अन्न-पाण्याचा एक कणही न घेता त्याने संयम, श्रद्धा आणि चिकाटीचे उदाहरण घालून दिले. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जाराच्या या प्रयत्नाबद्दल त्याचे आई-वडील, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या कृत्यामुळे इतर मुलांनाही धार्मिक संस्कारांची प्रेरणा मिळत आहे.
🔴🟢🟠🟣
