महाराजा कॉलेज चे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये यश
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार ६ डिसेंबर २०२५
तालुका प्रतिनिधी- नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील इयत्ता अकरावी सायन्स मधील विद्यार्थी
अमन नियाज शेख,सौरभ हौसराव घोडके,सूरज राहुल बायकर या विद्यार्थ्याच्या Master mind AI या maths calculator या उपकरणाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवीले. सदर उपकरणाची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी मॅडम व बाबासाहेब भोस साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यांना गणित विभाग प्रमुख हांडे मॅडम, राहुल खराडे सर , AI विभाग प्रमुख रेणुका शेळके मॅडम ,विज्ञान शाखाप्रमुख सौ बोरुडे मॅडम, जवळकर मॅडम तसेच पर्यवेक्षक रत्नाकर झीटे सर यांच्या मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर महादेव जरे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पाटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ.सुदाम भुजबळ, डॉ.नितीन थोरात, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🔴🟢🟠🟣
