महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार १० डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा:जागतिक एड्स दिनानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेज एन.एस.एस विभाग, ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा व हिंद लॅब श्रीगोंदा यांच्या वतीने एक दिवसीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन थायरॉईड व कावीळ यांच्या तपासण्या करण्यात आल्या.
सदर शिबिरामध्ये 152 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी एनइडीपी संस्थेच्या संगीता दराडे मॅडम यांनी स्व अनुभवातून एड्स वरती कशी मात केली व समाजामध्ये एड्स रुग्णांबद्दल समज आणि गैरसमज कसे पसरतात याविषयी मार्गदर्शन केले. कॉलेजचे पर्यवेक्षण रत्नाकर झीटे सर यांनी एचआयव्ही व एड्स यामधील फरक समजावून सांगितला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे सर यांनी एड्स जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिराचे महत्त्व समजून सांगितले. याप्रसंगी जूनियर एनएसएस विभाग प्रमुख फटे सर व सीनियर एनएसएस विभाग प्रमुख प्रा.डॉ.भाऊसाहेब बुलाखे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण आरोग्य रुग्णालय श्रीगोंदा मधील समन्वयक
अल्पना आमोलिक मॅडम यांनी मांडले. सूत्रसंचालन प्राध्यापक दरेकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विभाग प्रमुख श्री फटे सर यांनी केले.
🔴🟢🟠🟣
