श्रीगोंदा तालुक्यात विनापरवानगी विटभट्ट्या !
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ६ जानेवारी २०२६
प्रशासन कारवाई कधी करणार ? नागरिकांचा सवाल
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :श्रीगोंदा तालुक्यात सध्या विना परवानगी सुरू असलेल्या विटाभट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या बेकायदेशीर व्यवसायामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला आहे, शेती व जनसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.शासनाने विटाभट्टीसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या बंधनकारक केल्या असताना अनेक विटाभट्ट्या कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता वेगवेगळ्या ठिकाणावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार विटाभट्टीसाठीजमीन औद्योगिक किंवा ना-शेती (NA) असणे आवश्यक आहे.
त्यासाठी तहसीलदार अथवाप्रांताधिकारी यांचा ना-शेती आदेश, ७/१२ उतारा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा ठराव, व्यवसायपरवाना, शेजारील रहिवाशांचा हरकत नसल्याचा दाखला आवश्यक असतो.याच बरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी शिवाय चालू याशिवाय माती उत्खननासाठी गौण खनिज परवाना, रॉयल्टी भरणा, कामगार नोंदणी, बालकामगार प्रतिबंध नियमांचे पालन होत नाही, अग्निशमन विभागाची सुरक्षा मंजुरी, वीज व पाणी परवानगी आदी कागदपत्रे आवश्यक असताना अनेक ठिकाणी यापैकी एकही परवानगी नसल्याचे समोर येत आहे.या बेकायदेशीर विटाभट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर, धूळ व प्रदूषण वाढते शेतजमिनीची
सुपीक क्षमता कमी होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ व आरोग्याच्या अधिक समस्या भेडसावत आहेत. विशेष म्हणजे, संबंधित महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकत्यांकडून बोलले जात आहे. विना परवानगी विटाभट्ट्यांवर कारवाई हि कधी होणार आहे ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत. प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी व ताबडतोब करून बेकायदेशीर विटाभट्ट्या बंद कराव्यात व दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी निसर्ग प्रेमी, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत आहे.
🔴🟢🟠🟣
