सुटणार श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची तहान
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार, २२ मार्च २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अहिल्यांनगर जिल्ह्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत शेतीसाठी आवश्यक असणारा पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला असून ३६ दिवसांचे पाणी लोट क्षेत्रातून सोडण्यात येणार आहे. यामध्ये कर्जत–करमाळा परिसरासाठी ८ दिवसांपासून आवश्यकता भासल्यास १५ दिवस पर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
२६ मार्च आणि ३१ मार्च या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात होणार असून राशीन,आणि कर्जत मध्ये आवर्तन किंवा रोटेशं म्हणुया सुरू झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पाण्याचा वापर करताना नियमानुसार पावती काढून सहकार्य करावे. पाणी वापराचा मोबदला वेळेत भरल्यास पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे. तसेच चाऱ्यांवरील संबंधित पदाधिकाऱ्यांनीही थकबाकी जमा करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. विनापावती पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कुकडी पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी रोटेशनच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात पाणी मिळावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कर्मचारी रात्रंदिवस काम करत असून शेतकऱ्यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तलाव, नाले आणि विहिरींना पाझर देण्यासाठीही या पाणीपुरवठ्याचा उपयोग होणार असून भविष्यातील जलसंधारण प्रकल्पांसाठी पावती प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. या निधीतूनच नवीन बंधारे, तलाव आणि इतर जलसंधारण कामांना चालना मिळणार आहे.
सूचना:कुकडी पाटबंधारे विभागाला सर्वांनी सहकार्य करावे. नियोजनानुसार संपूर्ण क्षमतेने (टीएमसी) पाणी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
🟣🔴🟢🟠
