तांदळी दुमाल्यात मिनी बँक शाखांकडून जादा कमिशन वसुलीचा आरोप; नागरिकांमध्ये संताप
गुरुवार १४ मे २०२६
तांदळी दुमाला | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला परिसरात कार्यरत असलेल्या काही मिनी बँक प्रायव्हेट शाखांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तांदळी दुमाला आणि तांदळी दुमाला शाखेमार्फत टाकळी लोणार व परिसरातील काही मिनी बँक केंद्रांमध्ये पैसे काढताना ग्राहकांकडून जादा कमिशन आकारले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक बँकेत थेट जाण्याऐवजी या मिनी बँक केंद्रांचा वापर करतात. मात्र पैसे काढताना अंगठा लावून व्यवहार पूर्ण केल्यानंतर खात्यातून अधिक रक्कम वजा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही नागरिकांनी त्यांच्या खात्यातून परवानगीपेक्षा अधिक पैसे कापले जात असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. अशा प्रकारे गरीब व ग्रामीण नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी करून नागरिकांचे आर्थिक नुकसान थांबवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
करावाई आदेश; केंद्रशासन करवाई लवकरात लवकर करण्यात यावी रिपोर्ट पुरावे संख्या:२
🟣🔴🟢🟠
