अहिल्यानगर:ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन मिळावी. भूमिहीन शेतमजूर यांची मागणी वारंवार बी जी पी सरकारकडे व तहसीलदार, प्रांत यांना
अहिल्यानगर: भटक्या व शेतमजुरास जमीन नाही त्यांना जमीन मिळावी यासाठी शासकीय योजना आणि कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. परंतु अद्याप अहिल्यानगर मधील शेतकऱ्यांना जमीन मिळाली नसल्याने उदरनिर्वाह होत नसल्याने कितेक कुटुंब हतबल झाले असल्याचे दिसून आले आहे यासंबंधीच्या मागण्या आणि आंदोलने.आम्ही करणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काही सरकारी योजना आहेत. त्या आम्हाला मिळाव्यात या जमिनी मिळवण्यासाठी, भूमिहीन शेतमजूर म्हणून नोंदणी करून सुद्धा अद्याप १० वर्षापासून अर्ज करत असल्याचे सांगण्यात आले, शासकीय जमिनींसाठी अर्ज करणे किंवा कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे यांसारखे पर्याय आम्ही निवडले पण सरकार व तहसीलदार आम्हाला कुडलीही मदत देत नाहीत.
ज्यांना जमीन नाही अशांसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन वाटप करण्यासारख्या योजनांचा समावेश आहे. अशा योजनांची माहिती स्थानिक महसूल कार्यालयातून मिळून हि अद्याप प्रलंबित.
सरकारी गायरान जमिनीवर हक्क मिळवण्यासाठी आंदोलने आणि मोर्चे हे एक माध्यम आम्ही लवकरच अवलंबणार आहोत.आम्हाला जमीन मिळावी यासाठी, भूमीहीन म्हणून नोंदणी केली असता आणि शासकीय जमिनीसाठी अर्ज करून सुद्धा आम्हाला जमीन दिली नाही असे जमीनहिन शेतमजुरांनी सांगितले.
ज्या लोकांकडे जमीन नाही आणि ते शेतीवर अवलंबून आहेत, आम्ही सर्व भूमिहीन शेतमजूर आम्हाला जमीन द्यावी असे बी जी पी सरकारला विनंती करत आहोत आम्हा सर्वांना उदरनिर्वाह करण्यास जमीन द्यावी
