गौरी शुगर अँड डिस्टिलरीजचा तिसऱ्या गाळप हंगामाचा गव्हाण पूजन व बाॅयलर अग्निप्रदीपन उत्साहात संपन्न
श्रीगोंदा :- ओंकार शुगर ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीजचा तिसऱ्या गाळप हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला.
हा शुभारंभ रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील सुप्रिया पाटील ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील रेखा बोत्रेपाटील व ११ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला .
या वेळी जयंत पाटील म्हणाले की बाबुराव बोत्रेपाटील हा शेतकऱ्याचा मुलगा आहे या मुलाने बंद पडलेले १६ साखर कारखाने चालविण्यास घेतले हे शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव देऊन हे कारखाने उत्तम पध्दतीने चालविले आहेत या मुलाची शेतकऱ्यांच्या विषयी नियत चांगली आहे. यंदा १ लाख मेटन ऊसाचे गाळप करुन ओकांर शुगर ग्रुपचे सर्वाधिक ऊसाचे गाळप देशातील नंबर एकचा शुगर ग्रुप ठरणार आहे. याचा मला अभिमान आहे. हिरडगावचा साखर कारखाना माझे मित्र बबनराव पाचपुते यांचा होता पण त्यांना भाजपा प्रेम साखर कारखानदारीत जरा महागात पडले मी एक कारखाना विकत घेतला अनुभव नव्हता ३५० कोटी तोट्यात गेलो आता हा कारखाना मी बोत्रेपाटलांना देऊन टाकला आता तो सुरळीत चालू झाला आहे पैसा पेक्षा चालविण्याची अक्कल पाहिजे
साखर धंद्यात शेतकऱ्यांचे भले व्हावे अशी भावना असणारे टिकणार आहेत शेतकऱ्यांना लुटणारे घरीच बसणार आहेत.
बाबुराव बोत्रेपाटील म्हणाले की गौरी शुगरने गेल्या वर्षी ३१०१ रु ऊसाला भाव आणि शेतकऱ्यांना साखर दिली आहे यंदाच्या गाळप हंगामातही ऊसाच्या भावात एक पाऊल पुढे राहील अपेक्षेपेक्षा साखर कामगारांना पुढील वर्षीची दिवाळी गोड राहिल शेवटी ओंकार शुगर ग्रुपची स्थापना शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केले त्यामुळे १६ कारखाने चालू झाले आहेत. कामाचा व्याप वाढला आहे.
जनरल मॅनेजर रोहीदास यादव म्हणाले की यंदा नऊ लाख मेटनाने गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे त्यासाठी दररोज ९ हजार मे टनाने कारखाना चालविणार आहे शेतकऱ्यांनी प्राधान्याने ऊस द्यावा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस देऊन कारखान्यात सहकार्य करावे असे आवाहन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.
याप्रसंगी अशोक नागरी सहकारी बँकेचे चेअरमन श्री प्रकाश मथुरिया, संतोष बोत्रे विश्वासराव शितोळे, वैभवराव तावरे नवनाथ फराटे, शिल्पा कुडापणे माऊली पाचपुते मारुती औटी संपत दरेकर, टिळक भोस, अमोल दरेकर, सचिन चौधरी, संजय घाडगे, रवींद्र मोरे, बाळासाहेब वाबळे, शरदराव बोत्रे माऊली जगताप धनजय बोत्रे प्रविण बोत्रे उपस्थित होते
