पहिले समतावादी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन श्रीगोंदा येथे होणार : वसंतराव सकट
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २२ एप्रिल २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी :छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रणालीचे पहिले समतावादी ग्रामीण साहित्य संमेलन श्रीगोंदा येथे होणार अशी माहिती बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं
बहुजन समता पार्टीचे कार्यालयात आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आला . लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त व महामानवांच्या विचाराचा जागर व्हावा त्यांनी दिलेली शिकवण समाजामध्ये जाऊन त्यांच्या विचाराची देवाणघेवाण होण्यासाठी महामानाचा जागर म्हणून पहिले समतावादी ग्रामीण साहित्य संमेल न होणार असल्याने समतावादी विचार घेऊन अनेक मात्तेबर साहित्यिक आपली हजेरी लावनेसाठी येणार आहेत महाराष्ट्रभरातून अनेक साहित्यिकांचे विचार आपणास ऐकवण्यास मिळणार असून साहित्याचे भांडार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या संमेलनाचे रूपरेषा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून समतावादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये आपला सहभाग दाखवण्याचे आव्हान वसंतराव सकट यांनी केले.
यावेळी बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांचे बरोबर बहुजन समता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सचिन गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार,कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड,कर्जत शहराध्यक्ष राहुल पवार श्रीगोंदा शहराध्यक्ष अमोल ससाने अहिल्यानगर संघटक मधुकर उकिरडे, कर्जत तालुका कार्याध्यक्ष राघू जगधने, कर्जत तालुका उपाध्यक्ष गणेश केंदळे, कर्जत तालुका उपाध्यक्ष कुळधरण गट भाऊसाहेब जगताप,निखिल लोंढे कार्तिक गुंड, सचिन हिरामण गायकवाड,प्रणव गोरे,पवन भैलुमे, निखिल लोंढे,किशोर सकट,प्रकाश कांबळे, रोहिणी थोरात, नामदेव पठाडे , आदीसह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले तर आभार हिरामण गायकवाड यांनी मानले
🟣🔴🟢🟠
