देऊळगाव गलांडे येथे,आधुनिक लहुजी सेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले.
जिल्हा प्रतिनिधी: महेश थिटे संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मुख्यसंपादक मेजर भिमराव उल्हारे यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, विठ्ठल दांगडे (मामा) तर प्रमुख पाहुणे म्हणून मेजर प्रकाश शितोळे, मेजर अविनाश धुमाळ, मेजर महादेव ढोरजकर हे उपस्थित होते. संघटनात्मक जोश आणि सामाजिक बांधिलकीचा नवा अध्यायाची ठिकाणी सुरवात झाली असून ,
संस्थापक अध्यक्षा नगीनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वातून आणि जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.तालुका अध्यक्ष आबासाहेब तोरडमल यांच्या संकल्पनेतून शाखेची स्थापना करण्यात आली असून, येथील मातंग समाजाने संघटनेच्या कार्यात सक्रियपणे सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्तकेला.कार्यक्रमाला संबोधित करताना मेजर प्रकाश शितोळे यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
ते म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून समाजाला न्याय आणि माहिती मिळवून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी मी स्वतः सहकार्य करीन, असे आश्वासन त्यांनी दिले.संपादक मेजर भिमराव उल्हारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
महापुरुष स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी जगले. त्यांनी त्याग केला, म्हणून आपण आज उभे आहोत. त्यांचे विचार वाचा, आत्मसात करा त्यातूनच जगण्याचा आणि समाजासाठी लढण्याचा मार्ग सापडेल.
संघटित रहा -सामाजिक न्यायासाठी सज्ज व्हा यावर बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी संघटनेचे ध्येयधोरणे विशद करताना सांगितले की,सामाजिक न्यायासाठी संघटित होणे अत्यावश्यक आहे. आजची लढाई ही केवळ अस्तित्वाची नाही, तर आत्मसन्मानाची आहे. संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.अध्यक्षीय भाषणात सामाजिक समन्वयाचा संदेश देताना अध्यक्ष विठ्ठल दांगडे (मामा) यांनी सांगितले की,
देऊळगाव गलांडे येथील मातंग समाज हा गावच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत समन्वयाचे कार्य करत आला आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी न्यायिक भूमिका घेणे, हीच आमची बांधिलकी आहे.
यावेळी नुतन शाखा अध्यक्ष:- अशोक तुकाराम शिंदे ,उपाध्यक्ष:- किरण काशीनाथ शिंदे ,सचिव:- किरण शहाजी देडे, संभाजी शिंदेअध्यक्षा:- सारिका गोरख शिंदे ,उपाध्यक्ष:- मंदाबाई बाळू शिंदे ,सचिव:- संगीता आप्पा देडे ,युवक आघाडी: -अध्यक्ष: – आदित्य ज्ञानदेव शिंदे उपाध्यक्ष: – वैभव शिंदे ,सचिव: – प्रेम शिंदे, हर्षल अशोक शिंदे
कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य समाजबांधव व महिला भगिनींची उपस्थिती लाभली.
