आष्टी येथे वीज समस्येवर वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
२७ मे २०२६
विश्व निर्माता जालना जिल्हा प्रतिनिधी हरिचंद्र वाघमारे
आष्टी शहरासह रायगव्हाण, फुलवाडी, पळशी, आनंदगाव आणि आष्टी सर्कलमधील गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ दि. 26 मे 2026 रोजी आष्टी येथील महावितरण कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महावितरणचे अभियंता अनिकेत महाजन यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सहा तास थ्री-फेज वीजपुरवठा देण्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात केवळ साडेतीन ते चार तासच वीज दिली जात आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या आंदोलनात चोखा नाना, शेख जमीर भाई, हनुमान मोरे, भाऊसाहेब पोटे, गणेश वैद्य, परमेश्वर पोटे, शहाजी पोटे, रुद्र कडकडे, आलिम शेख, रामदास पोटे, काशिनाथ पोटे, एकनाथ केकान, अजून पठाण, संदिपान पोटे, केशव कडपे, तुकाराम शेळके, दत्ता थोरात, बाळासाहेब फुलारी, अर्जुन वाघमारे, नारायण राऊत, निलेश वाघमारे, सुरेश पोटे, शेषराव झोटे, सागर वैद्य, युसुफ अन्सारी, दिनकर धनवट, नजीम शेख, भागवत वाघमारे, सुरेश धडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आष्टी परिसरातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करून शेतकऱ्यांना नियमानुसार पुरेसा वीजपुरवठा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
🟠🟣🔴🟢
